gogate-college

राष्ट्रीय कार्यशाळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सुयश

झेवियर्स महाविद्यालय, म्हापसा आणि विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभाग, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा गोवा येथे नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेचा विषय ‘मायक्रोबियल बायोरेमिडीएशन- नोव्हेल अप्रोचेस अँड ट्रेंड’ असा होता. सदर कार्यशाळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे २० विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. कुणाल काजरेकर या विद्यार्थ्याने सादर केलेल्या ‘संशोधन प्रकल्पास’ पारितोषिक प्राप्त झाले. या कामी त्याला प्रगती शिंदे हिने मदत केली. या प्रकल्पाला विभागप्रमुख डॉ. चंदा बेर्डे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सागरी संशोधन केंद्र, गोवा आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,गोवा विद्यापीठ या ठिकाणी क्षेत्र भेट दिली.

यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.