gogate-college

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची दमदार कामगिरी

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची दमदार कामगिरी

नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत सुचिता तेंडूलकर, प्रतीक्षा साळवी यांना सुवर्णपदक, धनश्री शेलार, तेजस्विनी सावंत यांना रौप्य पदक आणि लावण्या सामसानी, नेहा कांबळे व नेहा नेने यांना कांस्य पदक मिळाले तर प्रथमेश पावसकर हा रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. यापैकी चार विद्यार्थ्यांची निवड केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता झाली आहे.

वरील सर्व विद्यार्थ्यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तिनही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.