gogate-college

सारस्वत बी.बी.ए. कॉलेज आयोजित स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची उज्ज्वल कामगिरी

Competition Success

सारस्वत बी.बी.ए. कॉलेज पणजी, गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘ओडिसी १५’ या राष्ट्रीय स्तरावरील मॅनेजमेंट फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅनेजमेंट फेस्टमध्ये एच. आर., मार्केटिंग, फायनान्स, एन्त्रप्रनर, बेस्ट मॅनेजर, टीम वर्क असे विविध इव्हेंट होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टीमवर्क इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामध्ये अश्विनी स्वाईन, ओंकार भागवत, आदित्य पटेल, आर्या अभ्यंकर व हृतिक ब्रीद या विद्यार्थ्यांनी सह्भाग घेतला.

बी.एम.एस. विभागातर्फे विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रा. अश्विनी देवस्थळी, प्रा. जफर शाह आणि विभागातील इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, बी.एम.एस. विभाग समन्वयक डॉ. मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले आहे.

Competition Success
Comments are closed.