gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कृष्णा मोरे याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पुरुष धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

के.आय.आय.टी.टी. युनिव्हर्सिटी, भुवनेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पुरुष धनुर्विद्या स्पर्धेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कृष्णा माणिक मोरे याची मुंबई विद्यापीठ पुरुष धनुर्विद्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. २६ ते ३० डिसेंबर या काळात संपन्न होणार आहे.

सदर स्पर्धेकरिता कृष्णा याला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा. ओंकार बाणे, प्राध्यापक, कर्मचारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.