gogate-college

पश्चीम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

Vollyball Team

तान्तिया विद्यापीठ, गंगानगर राजस्थान येथे १८ ते २१ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या पश्चीम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सुलेमान उप्पेरकर (प्रथम वर्ष कला), स्वराज सावंत (प्रथम वर्ष वाणिज्य) व अभिषेक मालगुंडकर (द्वितीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल आणि पुढील स्पर्धेसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तिनही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.