gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता निवड

आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता नुकत्याच झालेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांची निवड ‘सिनीअर ऑफिसर’ या पदाकरिता झाली. या निवड प्रक्रीयेमध्ये पौर्णिमा पवार, तेजस्विनी शेट्ये, चेतन गोरे, स्नेह्गौरी सूपल, विनीत तेंडूलकर, आकाश वरक, संकेत भारती, सुमित आंब्रे, सायली फळणीकर, रुपाली घाणेकर, प्रवीण भुर्के, अर्पिता पाटील, साची पिलणकर, पंकज हिंदळेकर आणि सुयश मुरकर हे विद्यार्थी यशस्वी झाले. हे सर्व विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागातील आहेत. निवड करण्यात आलेले विद्यार्थी सुरुवातीला ‘बँकिंग ऑपरेशन्स’मधील प्रशिक्षण पूर्ण करतील. त्यानंतर बँकेच्या विविध आस्थापनांमध्ये रुजू होतील.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन एन.आय.आय.टी., मुंबई आणि ड्राईव्हमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स अॅड प्लेसमेंट सेल तर्फे करण्यात आले होते. या प्रक्रियेचे यशस्वी नियोजन समन्वयक डॉ. रुपेश सावंत, डॉ. उमेश संकपाळ आणि डॉ. राम सरतापे यांनी केले.

Comments are closed.