gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची राष्ट्रीय खो-खोपटू अपेक्षा सुतार हिची ‘खेलो इंडिया टॅलेंट सर्च’ करिता निवड

केंद्र सरकारच्या खेलो इंडियाअंतर्गत टॅलेंट सर्चद्वारे निवडलेल्या देशभरातील विविध खेळांतील ७३४ खेळाडूंमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी राष्ट्रीय खो-खोपटू कु. अपेक्षा सुतार हिचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाच्या ऑलिम्पिक २०२४ या मिशनसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यासाठी देशभरातील विविध खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातूनच विविध खेळ प्रकारांतील ७३४ खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंना पाच वर्षांकरिता दरमहा दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. एक गुणी खो-खोपटू म्हणून कु. अपेक्षा हिची ओळख आहे. जानकी पुरस्काराने सन्मानित कु. अपेक्षा हिने महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे.
कु. अपेक्षा दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी जाणार असून तिच्या निवडीबद्दल आणि पुढील कारकिर्दीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, तिनही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे कार्यवाह श्री. संदीप तावडे, राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक श्री. पंकज चवंडे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Apeksha Sutar
Comments are closed.