gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे दि. १५ डिसेंबर रोजी स्वामी स्वरूपानंद जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस पुरस्कृत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.

कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात या स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेचे उद्घाटन रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. या स्पर्धेचे हे १५वे वर्ष असून दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ त्याच दिवशी संध्याकाळी ५.०० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कनिष्ठ गटासाठी ‘करी बुद्धीचा निश्चय, अंती सत्याचा विजय; स्वामी म्हणे सत्याचरण, देई आत्म-समाधान (संजीवनी गाथा; अभंग ८०); आरक्षण: सद्यस्थिती व अपेक्षा; शब्दप्रभू ग.दि.मा.’ तर वरिष्ठ गटासाठी ‘ ज्ञान हे चि जाण, कर्माचे लोचन; असावे संपूर्ण, निर्दोष ते (अभंग ज्ञानेश्वरी,९-६७५); नेमकी गरज कशाची ? बुलेट ट्रेन्स की बेटर ट्रेन्स; मला झालेले ‘पुल’ दर्शन असे विषय आहेत.

वैयक्तिक रोख बक्षिसे तसेच सांघिक भव्य चषक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, विजेत्या संघांचे मार्गदर्शकास प्रशस्तीपत्र देऊन दोन्ही गटातील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सांघिक चषक जिंकण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाचा दोन जणांचा संघ स्पर्धेला येणे गरजेचे आहे.

राज्यातील तरुण पिढीची सांगड अद्यात्म, नैतिकता आणि समाजविकास या प्रश्नांशी घालावी या उद्देशाने स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस याने या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता प्रा. दत्तात्रय वालावलकर (भ्रमणध्वनी ९८२२१९०६६९) यांच्याशी संपर्क साधावा तसेच या कार्यक्रमाला रत्नागिरीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.