gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये “इंटरनेट ऑफ थिंग्स” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने “इंटरनेट ऑफ थिंग्स”या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळा दि. ७ व ८ ऑगस्ट २०१८ रोजी माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळेत पार पडली. यासाठी श्री. तेजस कासारे , CEO, The Intellect Technologies, मुंबई हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले.
या कार्यशाळेमध्ये IoT या विषयाची ओळख, त्याचा उपयोग, फायदेतोटे आणि भविष्यातील संधी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच Arduino बोर्ड वापरून व्हाईस कमांडद्वारेलाईट्स चालू बंद करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अनेक प्रकल्प विषयांबद्दल चर्चादेखील या कार्यशाळेत करण्यात आली.
दि. ७ ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. राजीव सप्रे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन झाले. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, भौतिकशास्त्रआणि संगणकशास्त्र विभागाचे काही विद्यार्थी तसेच हेगशेट्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला. दि. 8 ऑगस्ट रोजी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख सौ. मेधा सहस्रबुद्धे, विभागाचे सर्व शिक्षक, संगणक शास्त्राच्या विभागप्रमुख सौ. अनुजा घारपुरे आणि सहभागी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हिबा मुजावर आणि कु. श्रुती घाडीगावकर या विद्यार्थीनिनी केले.

Comments are closed.