gogate-college-autonomous-logo

सी.एम.एस.आय.टी. सर्व्हीसेसच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

सी.एम.एस.आय.टी. सर्व्हीसेस या अग्रगण्य कॉम्पनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले. याकरिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयातील विद्यार्थींनाही संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलच्यावतीने घेण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेमध्ये छपन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अ‍ॅप्टिट्युड, कम्युनिकेशन व टेक्निकल अशा तीन ताप्यामधून विद्यार्थी पुढे गेल्यानंतर ४६ विद्यार्थ्यांची निवड अंतिम मुलाखतीकरिता झाली.

जोगळेकर महाविद्यालयाचे विशाल बंडबे आणि हिबा मुजावर हे विद्यार्थी डायरेक्ट प्लेसमेंटकरिता निवडले गेले. तर उर्वरित विद्यार्थी हे ट्रेनिंगमार्फत होणाऱ्या प्लेसमेंटकरिता निवडले गेले. नेटवर्क सपोर्ट इंजिनिअर, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिअर व टेक्नीकल सपोर्ट इंजिनिअर या पदांकरिता सदर निवड प्रक्रिया पार पडली.

महाविद्यालयातील या कॅम्पस ड्राईव्हमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, सदस्य डॉ. उमेश संकपाळ, डॉ. राम सरतापे यांचेही कॅम्पस ड्राईव्हच्या उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले आहे.

Comments are closed.