gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘विज्ञान शिक्षकांसाठी’ कार्यशाळा संपन्न

विविध खेळ खेळण्यात, कोडी सोडविण्यात, समूहचर्चा करण्यात आणि प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करण्यात रमून गेलेले रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘विज्ञान शिक्षकांसाठी’ कार्यशाळा संपन्न

विविध खेळ खेळण्यात, कोडी सोडविण्यात, समूहचर्चा करण्यात आणि प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करण्यात रमून गेलेले रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून आलेले विज्ञान शिक्षक असे चित्र गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रत्यक्ष साकार झाले. निमित्त होते महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘या स्टेप टू द ऍक्टिव्ह लर्निंग इन केमिस्ट्री’ या विज्ञान कार्यशाळेचे.

विद्यालयातील विज्ञानाचे शिक्षण अर्थपूर्ण आणि आनंददायी करण्यासाठी शिक्षकांनी शिकवण्याचे तंत्र बदलण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री तर्फे ‘युसूफ हमीद इन्स्पीरॅशनल केमिस्ट्रीप्रोग्रॅमची आखणी करण्यात आली आहे. नेहमीच्या व्याख्यान पद्धतीपेक्षा छोटे छोटे खेळ, कोडी, समूह चर्चा, प्रात्यक्षिक अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी सारून घेत शिकवणे शक्य आहे आणि यासाठी शिक्षकांना प्राकशिक्षित करण्याच्या उद्देशाने भारतातील विविध राज्यात तर्फे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशाळेतील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळा घेण्यात आली. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीतर्फे प्रशिक्षक म्हणून डॉ. विमला ओक यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाला माध्यमिक शिक्षण विभागाने मान्यता दिली होती तर जिल्हा शिक्षक विज्ञान मंडळाने हा उपक्रम विज्ञान शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र इनामदार आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या कार्यशाळेच्या समन्वयाची जबाबदारी निभावली. रत्नागिरी परिसरातील विविध शाळांमधून चाळीस शिक्षक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

GJC Workshop
GJC Workshop
Comments are closed.