gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुग्धा पोखरणकर आणि मुक्ताई देसाई यांचे विज्ञान संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश

विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे याकरिता प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान संशोधन पुरस्कारांची योजना सन २००१-०२ पासून अंमलात आणली जात आहे. विद्यमान वर्षी ही स्पर्धा मराठी विज्ञान परिषदेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दि. ०२ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी विज्ञान परिषद कार्यालय, मुंबई येथे आयोजित केली होती या ‘विज्ञान संशोधन स्पर्धेत’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. मुग्धा पोखरणकर आणि कु. मुक्ताई देसाई या प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या ‘अ मॅथमॅटीकल मॉडेल फॉर द डायग्नोसिस ऑफ डायबेटीस, अॅनेमिया अॅड हायपरटेन्शन बाय युजिंग फज्जी मॅट्रिक्स’ या संशोधन प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. एप्रिल महिन्यात होणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक दिनी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. त्यांना गणित विभागाचे प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

विजेत्या विद्यार्थिनींचे मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक पाटकर, जिल्हा समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. उमेश संकपाळ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कौतुक केले आहे.

Comments are closed.