gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘विज्ञान दिवस’ तसेच ‘अरुअप्पा जोशी स्मृतिदिन’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ३५वा विज्ञान दिन ऑनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला. विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सायन्स असोसिएशन तर्फे ‘जर्मनीतील शिक्षणाच्या संधी’ या विषयावर व्याखान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात डॉ. अरविंद नातू, आयसर, पुणे यांनी ‘मुलभूत विज्ञानातील संशोधन व उपलब्ध संधी’ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर सौ. गिरीजा जोशी, डॅड रिजनल ऑफिसर, इन्फर्मेशन पॉइंट, पुणे यांनी जर्मनीत असणाऱ्या उच्चशिक्षणाच्या संधी यावर व्याख्यान दिले. सदर व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला.

र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी कै. अरुअप्पा जोशींच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे आणि प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स असोसिएशनचे प्रा. एम. बी. कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. वर्षा घड्याळे यांनी केले.

Comments are closed.