gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘विज्ञान दिना’चे अनोखे आयोजन

जागतिक पाणथळ दिन

रत्नागिरीमधील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्यावतीने शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळात महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या 10 प्रयोगशाळांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

विज्ञान प्रदर्शनासाठी या प्रयोगशाळा सर्व नागरिकांना खुल्या राहतील. या प्रदर्शनात प्रयोगशाळेतील वेगवेगळी उपकरणे सर्व रत्नागिरीकरांना पहावयाला मिळतील. यामध्ये वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, बायोकेमेस्ट्री, संगणकशास्त्र, आय.टी., मायक्रोस्कोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी व रसायनशास्त्र विभागांमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या प्रदर्शनाचा लाभ रत्नागिरीतील सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.