gogate-college

कौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘सप्तरंग’ नुकतेच पार पडले. पाककला स्पर्धेतील २१ पाककृती, सुशोभित कुंड्या यांनी निसर्ग प्रेमींना एकत्र आणले तर मैदानावर क्रिकेटचे सामने रंगले आणि वर्षभराच्या शैक्षणिक ताण-तणावातून दूर राहण्यासाठी अविस्मरणीय क्षणांची शिदोरी घेऊन पुढील शैक्षणिक वर्षाच्या कामासाठी आणि येणाऱ्या नॅकच्या कामासाठी सारे कर्मचारी वृंद ताजेतवाने झाले.

‘सप्तरंग’मध्ये प्रथमच पाककलेचा आस्वाद घेण्यासाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षण सौ. सरिता तुळशीदास रोकडे आणि सौ. अश्विनी पराग गांधी यांनी केले. प्रा. श्रावणी विभूते यांच्या रवा मोदक आणि वांगे भाजी या डिश प्रथम क्रमांक विजेत्या ठरल्या. डॉ. सोनाली कदम यांच्या आकर्षक सजावट केलेली इडली द्वितीय क्रमांक विजेती ठरली तर प्रा. नीता खामकर यांच्या खमंग चना मसाला या डिशने तृतीय क्रमांक पटकावला. चाट पाककृतीमध्ये प्रा. चैत्राली केतकर यांना प्रथम, प्रा. हर्षदा पटवर्धन यांना द्वितीय तर डॉ. राजीव सप्रे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

सुशोभित कुंडी स्पर्धेसाठी डॉ. चित्र गोस्वामी यांना प्रथम क्रमांक, डॉ. सीमा कदम यांना द्वितीय तर प्रा. अजिंक्य पिलणकर यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी केले.

‘गोगटे प्रीमियर लीग’ या अंडर आर्म स्पर्धेत ४२ कर्मचारी सहभागी झाले. या स्पर्धेत ‘सप्रेज सनरायझर्स’ संघ उपविजेता ठरला तर ‘बापूज गॅग’ या संघाला विजेतेपद मिळाले.

संपूर्ण ‘सप्तरंग’ स्नेहमहोत्सवाकारिता स्टाफ सेक्रेटरी प्रा. आनंद आंबेकर, श्री. प्रसाद गवाणकर, डॉ. विनोद शिंदे, डॉ. यास्मिन आवटे, प्रा. शरद आपटे यांनी विशेष मेहनत घेतली. ‘सप्तरंग’ स्नेहमहोत्सव यशस्वी केल्याबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.