gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘संशोधन उपकरणे ओळख’ कार्यशाळा संपन्न

महाविद्यालयाची संशोधन क्षेत्रातील कामगिरी ही उपलब्ध असणाऱ्या उपकरणांमुळे होत असते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात असणाऱ्या ‘संशोधन उपयुक्त उपकरणांची ओळख’ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी, या प्रमुख हेतूने महाविद्यालयात नुकतेच ‘संशोधन उपकरणे ओळख’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी आंतरविभागीय संशोधनाची आजच्या युगात असणारी आवशकता विशद केली. भविष्यात अशीच कार्यशाळा जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांकरिता घेण्याचा मानस याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शास्त्र शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी केले. सिस्टिम, थिन फील्म फॅब्रीकेशन बाय स्प्रे पायरोलीसीस टेक्निक, एसआयएलएआर, मॅग्नस कँमेरा फॉर मिक्रोस्कोपीक ऑब्जेक्टस, ऍटोमिक ऍबसॉर्ब्सशन स्पेक्ट्रोफोटोमीटर, वॉटर ऍनालिसिस किट, स्पेक्ट्रोफ्लूरोमीटर, यूव्ही चेंबर, कार्ल झेस मायक्रोस्कोप, इ सुमारे १४ महत्वाच्या उपकरणांची तत्वे, कार्यपद्धती, आणि उपयोग यांची माहिती देण्यात आली. हि माहिती दहा तज्ज्ञ प्राध्यापकांनी दिली. या कार्यशाळेला ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मिलिंद गोरे, डॉ. महेश बेळेकर, डॉ. मंगल पटवर्धन मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आभारप्रदर्शन ओंकार पेंढारकर यांनी केले.

Comments are closed.