gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे नुकतीच रोजी राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या स्पर्धेच्या युगात संशोधनाला खूप महत्त्व आहे. हेच कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाच्या गणित विभागाने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत चिपळूण, देवरुख, लांजा, कुडाळ, रत्नागिरी अशा विविध महाविद्यालयातील १८ स्पर्धक ९ गटातून सहभागी झाले.

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव, देवरुखचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि मॉडर्न महाविद्यालय, पुणे येथील गणित विभाग प्रमुख डॉ. स्वाती कंधारकर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

सहभागी स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणातून मांडलेले विविध प्रकारचे गणितातील संशोधन, परिक्षकांनी त्यांना विचारलेले प्रश्न, त्यावर स्पर्धकांनी दिलेली समर्पक उत्तरे अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात स्पर्धा संपन्न झाली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना सर्व स्पर्धकांचे स्वागत केले आणि स्पर्धेकरिता आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

एस. आर. एम. महाविद्यालाय, कुडाळ येथील प्रा. श्रीपाद प्रभू यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ पार पडला. त्यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवले. यामध्ये प्रथम क्रमांक जस्टीन किझाखेकुट्ट, प्रथमेश नवरे; गोगटे जोगळेकर महाविद्यालय; द्वितीय क्रमांक नीरजा नागवेकर , वेलीसा फर्नांडीस; एस. आर. एम. महाविद्यालय, कुडाळ; तृतीय क्रमांक कपिल केळकर, अपूर्वा आचार्य; गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि उत्तेजनार्थ दिक्षा निमजे, नेत्रा शिर्के; ए. एस. पी. महाविद्यालय, देवरुख यांनी पटकावले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. अपूर्वा आचार्य हिने केले. गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्विपणे संपन्न झाली.

Comments are closed.