gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. सोनाली कदम यांच्या संशोधन पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. सोनाली कदम यांच्या संशोधन पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. सोनाली कदम यांच्या ‘चेंज इन फ़िजिओलॉजिकल पॅरामिटर्स इन इल्युसीन कॉराकाना ग्रांट अंडर ट्रेस कंडीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विधीसभा सदस्य डॉ. बालाजी केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. बांग्लादेश व भारतीय प्रकाशनाच्या संयुक्त सहकार्याने या पुस्तकास प्रसिद्धी देण्यात आली.

कोकणातील एक महत्वाचे पीक असलेल्या ‘नाचणी’ या पिकाच्या गुणवैशिष्ट्यची मांडणी करताना या पिकाचा इतर पिकांच्या तुलनेत असणारी कर्बोदके, लोह व प्रथिने यांचे अधिक प्रमाण, इतर पिकांच्या तुलनेत या पिकाची भौगोलिक वाढीची क्षमता अधिक असल्याचे त्यांनी मांडले. कोकणाला लाभलेल्या ७५० किमीचा विस्तीर्ण किनारा आणि तेथील क्षारयुक्त जमीन व पाण्याची कमी धारणक्षमता या परिस्थितीत पिकाची असणारी उगवण क्षमता यामुळे नाचणी हे पिक क्षारयुक्त जीमिनिमध्ये कमीत कमी पाण्यावरही चांगले उत्पन्न देऊ शकते. आपल्या गुणसत्वांनी परिपूर्ण असणाऱ्या या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना, संशोधकांना उपयुक्त अशा माहितीचा समावेश डॉ. सोनाली कदम यांच्या या संशोधन ग्रंथात आहे.

आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा प्रारंभ कनिष्ठ महाविद्यालयात करून वरिष्ठ महाविद्यालयात १२ वर्षाहून अधिक काळ त्यांनी अध्यापन आणि संशोधन केले आहे. त्यांचे ११ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच एका आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या पुस्तकात एका अभ्यास प्रकरणाचा समावेश आहे. डॉ. सोनाली यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागात मागील सहा वर्षापासून योगदान दिले आहे.

त्यांच्या या संशोधनात्मक प्रकाशनाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.