gogate-college-autonomous-logo

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उज्ज्वल यश

महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कोकण विभागीय स्तरातून प्रथम क्रमांक मिळवत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची ‘म्याडम’ एकांकिका विजेती ठरली आहे. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पारितोषिकासह उत्कृष्ट अभिनयाकरिता ‘शरद तळवलकर चषक’ महाविद्यालयाच्या कु. स्मितल मिलिंद चव्हाण हिने पटकावला आहे.

शिक्षणाचे महत्व आणि भावनांची जपणूक करणारी ‘म्याडम’ एकांकिका असून जीवनातला कितीही कठीण प्रसंग असला तरी त्यावर मात कशी करावी यावर संदेश देण्यात आला आहे. ऐश्वर्या बापट, गौरी साबळे, स्मिताला चव्हाण, साक्षी कोतवडेकर यांनी भूमिका साकार केल्या असून नैपथ्य विशाल कांबळे, गौरव बंडबे, निखिल धावडे यांनी तर संगीत ओंकार सावंत व रत्नेश कांबळे यांनी दिले आहे. अनिकेत आपटे आणि श्रावण सनगरे यांनी प्रकाशयोजना केली. सर्वांना सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आनंद आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी कलाकार, सहाय्यक आणि मार्गदर्शक यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.