gogate-college-autonomous-logo

डॉ. रामा सरतापे लिखित ‘दारिद्रय रेषेखालील कुटुंब दर्जाचे अध्ययन’ पुस्तकाचे प्रकाशन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभगातील डॉ. रामा सरतापे यांच्या ‘दारिद्रय रेषेखालील कुटुंब दर्ज्याचे अध्ययन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांचे हस्ते करण्यात आले.

भारतातील दारिद्रयाचा अभ्यास विविध संस्था व सरकारच्या विविध आस्थापनांच्या माध्यमातून केला जातो मात्र कुटुंबांच्या दर्जाचा अभ्यास प्रत्येकवेळी वास्तविक स्वरूपात मंडला जाईल असे नाही. डॉ. सरतापे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील २०० कुटुंबांचा अभ्यास करून त्याविषयाचे संशोधनात्मक भाष्य आपल्या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इदिरा आवास योजनेचा प्रभाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांवर कोणत्या प्रकारे झाला आहे याचे निर्देशांक पद्धतीने व प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यासातून आलेली वास्तविक माहिती या पुस्तक रूपाने वाचकांसमोर ठेवली गेली आहे.

या पुस्तकाच्या माध्यमातून शासकिय योजना, त्यांचे प्रत्यक्ष समाजातील लाभार्थी आणि योजनेचा प्रभाव या आणि अशा अनेक विषयांचा मातील दोन वर्षे सतत्याने अभ्यास करून त्या अभ्यासाला अर्थशास्त्रीय परिभाषेत आणण्याचे यशस्वी कार्य त्यांनी केले आहे. या पुस्तकातील ज्ञानाच्या सहाय्याने शासकिय आस्थापना, अर्थशास्त्रीय संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. डॉ. सरतापे यांना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.

या प्रकाशन सोहोळ्याला मिठीबाई महाविद्यालयातील डॉ. विनायक दळवी, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांचेसह डॉ. सरतापे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या या साहित्य निर्मितीबद्दल महाविद्यालयातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Sartape sir
Comments are closed.