gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राजकारण आणि सिनेसंसार विषयक प्रदर्शन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप या युवासांस्कृतिक महोत्सवात शैक्षणिक विभागांच्यावतीने विविध संकल्पनांवर आधारित प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. साहित्याप्रमाणेच चित्रपटही समाजजीवनाचा आरसा आहेत. समाजकारण आणि राजकारणाचेही प्रतिबिंब चित्रपटातून व्यक्त होत असते. राज्यशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांनी उभारलेल्या प्रदर्शनात जुन्या मराठी, हिंदी सिनेमांपासून आताच्या नवीन सिनेमांपर्यंत चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजकारण आणि सिनेसंसार या विषयावरील प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब प्रकट होणारा ‘सिंहासन’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

आपले मनोतात व्यक्त करताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ‘राजकारण आणि चित्रपट ही अत्यंत सुंदर संकल्पना असून समाजजीवनातील विविधांगी पैलूंचे दर्शन सिनेमातून होते.’ राज्यशास्त्र विभागाचा हा उपक्रम निश्चितच उल्लेखनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले.

Comments are closed.