gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेमध्ये सिनिअर ऑफिसर पदावर निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेमध्ये सिनिअर ऑफिसर पदावर निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील दहा विद्यार्थी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून नुकेतच आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या पुणे, मुंबई, गोवा आणि रत्नागिरी या ठिकाणी ‘सिनिअर ऑफिसर’ या पदावर रुजू झाले आहेत.

महाविद्यालयाच्या ‘करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेल’तर्फे जानेवारी आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले गेले होते. यातून चौदा विद्यार्थी निवडले गेले; त्यांचे प्रशिक्षण एन.आय.आय.टी., मुंबई यांचेमार्फत महाविद्यालयात मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये पूर्ण झाले. बँकिंग ऑपरेशन्समधील हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लगेचच पंकज हिंदळेकर, आकाश वरक, सुयश मुरकर, उत्सवी नार्वेकर, रिजुल मलुष्टे, अमृता जोशी, मयुरी भुर्के, येजास्विनी शेट्ये, अर्पिता पाटील आणि रुपाली घाणेकर बँकेत रुजू झाले.

ही सर्व प्रक्रिया प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी यशस्वीरित्या नियोजनबद्धपद्धतीने हाताळली. सेलचे सदस्य डॉ. उमेश संकपाळ आणि डॉ. रामा सरतापे यांचे सहकार्य लाभले. तसेच एम.आय.आय.टी.मार्फत श्री. निरंजन मोहिते व श्री. तुषार सोनी यांनी सर्व प्रक्रिया यशस्वीपणे हाताळली.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. अशाच चांगल्या रोजगाराच्या सुसंधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यास महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेमध्ये सिनिअर ऑफिसर पदावर निवड
Comments are closed.