gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता निवड

महाविद्यालायालायाच्या करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट सेल तर्फे २९ डिसेंबर २०२० रोजी आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता एम.आय.आय.टी., मुंबईच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता २६ विद्यार्थी सहभागी झाले होते तर ०७ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये करिश्मा नागवेकर, यश झोरे, अंकिता आखाडे, शिवराज घोसाळकर, अमृता तोडणकर, मयुरी देसाई आणि शिवानी चवंडे यांची सिनियर ऑफिसर पदाकरिता निवड झाली आहे. सुरुवातीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला सामोरे गेल्यानंतर सदर विद्यार्थी बँकेच्या विविध शाखांमध्ये रुजू होतील.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्र. प्रचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. यावेळी प्राचार्यांनी भविष्यात चांगल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन केले.

Comments are closed.