gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कम अँड लर्न फिजिक्स- अ फिजिक्स फेअर’ संपन्न

कम अँड लर्न फिजिक्स

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे ‘कम अँड लर्न फिजिक्स- अ फिजिक्स फेअर’ या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमात महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील पदवीचे विद्यार्थी हे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्रातील मुलभूत संकल्पना समजावतात. उर्जा, ध्वनी, प्रकाश, बल, विद्युत चुंबकीय परिणाम यांवर आधारित प्रयोग आणि प्रतिकृतींचा वापर संकल्पना स्पष्ट होण्यासाठी करण्यात येतो. या उपक्रमात श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल (जीजीपिएस) आणि रा. भा. शिर्के प्रशालेतील अनुक्रमे ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष प्रयोग करून संकल्पना समजावून घेण्याचा उपक्रम असल्याने सदर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सकारात्मक प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर उपक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी सदिच्छा भेट दिली. हा सुनियोजित उपक्रम भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेश बेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाला.

Comments are closed.