gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात औषधनिर्मिती कौशल्य कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग आणि असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्किल डेव्हलपमेंट इन फार्मा रिलेटेड इंडस्ट्री फॉर एम.एस्सी. स्टुडेंटस’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. औषधनिर्मिती उद्योगांमध्ये होणाऱ्या विविध रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे होतात, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती याची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी या उद्देशाने सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी अशाप्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे उपयोगी आहेत हे सविस्तरपणे विषद केले. एशिया पॅसिफिक रिजन, इंधन तंत्रज्ञान विभाग, मुंबईचे प्रमुख आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. हेमंत मोंडकर उपस्थित होते. सदर कार्यशाळेला तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून एमक्युअर फार्मा, पुणे येथील संशोधन विभागाचे माजी संचालक डॉ. जी. मैकॅप यांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती कारखान्यांमध्ये होणाऱ्या विविध प्रक्रियांची माहिती सांगितली. तसेच या उद्योगांमध्ये होणारी लेखापरीक्षणे आणि पेटंटसची माहिती दिली. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना कार्यशाळेचे प्रयोजन विषद केले.

या कार्यशाळेकरिता विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे, डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. मयूर देसाई, विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात औषधनिर्मिती कौशल्य कार्यशाळा संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात औषधनिर्मिती कौशल्य कार्यशाळा संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात औषधनिर्मिती कौशल्य कार्यशाळा संपन्न
Comments are closed.