gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा नोव्हार्टीस आरोग्य परिवार तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समाज कर्य कोवीड-19 महामारी दरम्यान सुद्धा स्वयंप्रेरणेने विविध क्षेत्रात जोमाने चालूच आहे. महाविद्यालयाचे स्वयंसेवक रत्नागिरी शहरातल्या विविध शाळां मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात सहकार्य करीत आहेत. तसेच व्यसन मुक्ती, कोवीड-19 दरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत या स्वयंसेवकांनी आत्तापर्यंत जिल्हाभरात 30 पथनाट्य सादर केली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि नोव्हार्टीस आरोग्य परिवार यांच्या मार्फत रत्नागिरी तालुक्यात विविध ठिकाणी ताप, साथीचे रोग, स्वच्छता इत्यादी विषयांवर पथनाट्य मोहीम राबविण्यात आली. नोव्हार्टीस आरोग्य परिवाराच्या आरोग्य विषयक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल नोव्हार्टीस आरोग्य परिवार तर्फे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी नोव्हार्टीस आरोग्य परिवारचे बिरादार साहेब, तुशांत भिंगार्डे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम, प्रा. शिवाजी उकरंडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments are closed.