gogate-college

तृतीय वर्ष कला आणि विज्ञान (रिपीटर) विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरणेविषयी

मुंबई विद्यापीठातर्फे ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या तृतीय वर्ष कला आणि विज्ञान (सेमिस्टर पाच आणि सहा- ७५:२५-रिपीटर) विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. सदरचा फॉर्मची एक प्रत विद्यार्थ्यांना त्यांची सही घेण्यासाठी देण्यात येईल तरी सबंधित सर्व विद्यार्थ्यांनी कार्यालयात श्री. केतकर यांना भेटावे.

परीक्षा अर्जासोबत सेमिस्टर पाच आणि सहा मार्कशीट झेरॉक्स, एका विषयासाठी रू. २६०/-; दोन विषयांसाठी रू. ४७०/- आणि तीन किंवा तीनपेक्षा जास्त विषयांसाठी रू. ९९५/- असे परीक्षा शुल्क आहे. याकरिता अंतिम दिनांक ११ मार्च २०१९ असून दि. १६ मार्च २०१९ पर्यंत रू. १०० विलंब शुल्क तर दि. २९ मार्च २०१९ पर्यंत रू. ५०० विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना आपले परीक्षा अर्ज भरता येणार आहेत.

सदर परीक्षा अर्ज दि. १ मार्च २०१९ पासून कार्यालयात मिळतील, असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.