gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रबंधक श्री. मोहन कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रबंधक श्री. मोहन कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रबंधक श्री. मोहन कांबळे यांचा स्वेच्छानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. श्री. कांबळे दि. १ ऑगस्ट १९८५ रोजी कनिष्ठ लिपिक म्हणून महाविद्यालयात रुजू झाले. नोकरीच्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कनिष्ठ लिपिक ते प्रबंधक अशा विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. अशासकीय शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पहिले. एक उत्कृष्ट क्रीडापटू म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. प्रारंभी उपस्थितांना प्रा. तृप्ती धामणस्कर आणि प्रा. चेतन मालशे यांनी श्री. कांबळे यांच्यावर तयार केलेली लघुचीत्रफित दाखविण्यात आली. याप्रसंगी व्यापीठावर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सत्कारमूर्ती श्री. मोहन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना श्री. कांबळे यांनी आपला विद्यार्थी ते मुंबई विद्यापीठ सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त केलेले प्रबंधक असा प्रवास उलगडून दाखवला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सेवा बजावताना आलेल्या विविध अनुभवातून जीवनात खूप काही नवीन शिकायला मिळाले, असे सांगून महाविद्यालयाला भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या तर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष आणि प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते श्री. मोहन कांबळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष प्रा. माधव पालकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, जनसंपर्क अधिकारी श्री. प्रसाद गवाणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी श्री. कांबळे यांच्या स्वभाव, कार्यातील गुणवैशिष्ट्ये अधोरेखित केली. महाविद्यालयाच्या प्रशासनात प्रबंधक म्हणून त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला तीनही शाखांचे उपप्राचार्य, वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रबंधक श्री. मोहन कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रबंधक श्री. मोहन कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न
Comments are closed.