gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, कोतोली, कोल्हापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार(MoU) संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, कोतोली, कोल्हापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार(MoU) संपन्न

रत्नागिरी शिक्षण संस्थेचे गोगटे – जोगळेकर महाविद्यालय आणि कोतोली, कोल्हापूर येथील श्रीपतराव चौगुले महाविद्यालय यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक नामवंत महाविद्यालय असून, नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाने सतत चार वेळा ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, संशोधन अशा विविध क्षेत्रात महाविद्यालयाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाविद्यालयाने महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध आस्थापनांबरोबर सामंजस्य करार केले असून, विद्यार्थी आणि समाजाभिमुख विविध शैक्षणिक-सहशैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, कोल्हापूर यांच्यामध्ये पाच वर्षांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या सामंजस्य करारांतर्गत फॅकल्टी- स्टुडंट एक्सचेंज, बौद्धिक संपदा हक्क, पब्लिक आउटरिच कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन दोन्ही आस्थापनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.

याप्रसंगी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी आणि श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वंदना पाटील यांनी आपापल्या महाविद्यालयाची माहिती उपस्थितांना देऊन भविष्यात शिक्षक आणि विद्यार्थीभिमुख कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी प्रा.डॉ. राजीव सप्रे आणि प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी उपस्थितांना नॅक संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच चौगुले महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. च्या सदस्यांनी गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाने पार पाडलेली नॅक प्रक्रिया, महाविद्यालयातील कार्यालयीन – प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक – सहशैक्षणिक विभागांनी राबविलेले विविध उपक्रम यांची माहिती घेतली. या सामंजस्य कराराप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, चौगुले महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वंदना पाटील, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ सुरेंद्र ठाकुरदेसाई, चौगुले महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.चे सदस्य डॉ. मंगल पटवर्धन, डॉ मकरंद साखळकर, डॉ. विवेक भिडे, सामंजस्य करार समितीच्या समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी आदीसह दोन्ही महाविद्यालयातील विज्ञान आणि कला शाखेतील विविध विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

Comments are closed.