gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ०४ ते २४ फेब्रुवारी रोजी मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे दि. ०४ ते २४ फेब्रुवारी २०१९ या कालावधित मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल खात्यातील जुनी कागदपत्रे, कोर्टातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, इतिहासातील महत्वाच्या घटनांची कागदपत्रे मोडीलिपीत जतन केलेली असून आज मात्र समाजात मोडी वाचन करणाऱ्यांची फार मोठी वानवा आहे. ही उणीव थोडीशी का होईना दूर करण्याच्या हेतूने इतिहास विभागाने सदर प्रशिक्षण हाती घेतले आहे.

हा प्रशिक्षण वर्ग मुख्यत: महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार असला तरी इतर कोणत्याही विद्याशाखेतील इच्छुक विद्यार्थ्यांना तसेच ज्या नागरिकांना ही लिपी शिकण्याची इच्छा आहे अशांनी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. आर. एच. कांबळे यांच्याशी (९४२३०४७२९५) अथवा प्रा. पंकज घाटे (९४०५५२२११०) यांना संपर्क करावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.