gogate-college

जागतिक खारफुटी दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रदर्शनाचे आयोजन वनस्पतिशास्त्र विभागाचा अभिनव उपक्रम

प्रतिवर्षी दि. २६ जुलै रोजी ‘जागतिक खारफुटी दिन’ सर्वत्र साजरा केला जातो. किनारपट्टी परिसरात आढळणाऱ्या खारफुटी परिसंस्था आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण अशा खारफुटी वनस्पतींविषयी जन-जागृती यानिमित्ताने करण्यात येते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे या निमित्ताने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. खारफुटी परिसंस्था तसेच तेथील वैशिष्ट्यपूर्ण खारफुटी वनस्पती प्रजातींविषयी माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. रायझोफोरा, अॅव्हिसिनिया, सोनारेशिया, सिरीऑप्स, एक्झोर्केरिया, लुअनिटझेरा, अकँथस इ. प्रमुख खारफुटी प्रजातींचे नमुने यावेळी प्रदर्शित करण्यात आले. खारफुटी वनस्पतींमधील अनुकूलन तसेच त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण जीवनक्रम व त्यांचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्व याविषयीची माहिती विद्यार्थी स्वयंसेवकांनी दिली.

श्री. सुभाष पुराणिक, सहाय्यक वनसंरक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा यांनी सदर प्रदर्शनास भेट दिली. खारफुटी वनस्पती आणि या परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धन आपण वेगवेगळ्या पातळीवर करू शकतो; त्यात आपण विशिष्ट भूमिकेने सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात केले. तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी प्रदर्शनाच्या आयोजनात घेतलेल्या सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले.

प्रा. विवेक भिडे, विज्ञान शाखा उपप्राचार्य तसेच कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. जीजीपिएस प्रशाला तसेच कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील तृतीय वर्ष विज्ञान या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बाजवली. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.

h
h
h
Comments are closed.