gogate-college

महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटच्या कमांडर्सची गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला भेट

ncc-news

महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटचे प्रमुख कमांडिंग ऑफिसर अलोक लांगे आणि युनिटमध्ये कमांडिंग ऑफिसर पदावर नव्याने रुजू होणारे लेफ्टनंट कमांडर एम. एम. सईद यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर यावर्षीची एन.सी.सी. विभागातील प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रिया, नौदलात उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी व त्यानुसार महाविद्यालयात सुरु करता येतील असे कोर्सेस, एन.सी.सी. कॅम्प आणि विद्यापीठाच्या परीक्षांमधील समन्वय अशा विषयांवर चर्चा झाली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी रत्नागिरीतून मुंबई येथे बदली झालेले कमांडर अलोक लांगे यांना शुभेच्छा दिल्या आणि एन.सी.सी. युनिटमध्ये रुजू होणारे नूतन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कमांडर एम. एम. सईद यांचे अभिनंदन करून एन.सी.सी. युनिटच्या सर्व कार्यक्रमांना सक्रीय मदत करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी महाविद्यालयातील एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. अरुण यादव आणि लेफ्ट. स्वामिनाथन भट्टार उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील जनसंपर्क अधिकारी श्री. प्रसाद तथा बापू गवाणकर आणि त्यांचे सहकारी यांनी बहुमोल सहकार्य केले.

Comments are closed.