gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. भाग- १ करिता प्रवेश सुरु

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता एम. ए. भाग-१ प्रवेश प्रक्रिया लोकमान्य टिळक पदव्युत्तर विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १७ जुलै २०१८ पासून सुरु झाली आहे. सन २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ वेबसाईटवर उपलब्ध ग्रेडकार्डाची झेरॉक्स प्रत, पाचव्या सेमिस्टरची झेरॉक्स प्रत, शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र दाखल्याची झेरॉक्स प्रत, दोन रंगीत फोटो जोडणे आवश्यक आहे.
प्रवेश अर्ज महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून सदर अर्जावर डॉ. रमेश कांबळे यांची सही घेणे आवश्यक आहे. सही झाल्यावर प्रवेश अर्ज कार्यालयात श्री. ओंकार पोंक्षे यांचेकडून चलन घेऊन ते फी चार्ट प्रमाणे पूर्ण भरून बँक ऑफ महाराष्ट्र, गोगटे कॉलेज शाखा येथे भरावे; त्यानंतर प्रवेश अर्ज कार्यालयात श्री. नागेश भारती यांचेकडे जमा करावा; असे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.