gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील एम.ए. प्रवेशाकरिता सामान्य चाचणी परीक्षा दि. १ जुलै रोजी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक पदव्युत्तर विभागाकरिता एम.ए. भाग-१ या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये तर समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र या सामाजिकशास्त्र विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या सर्व विषयांचे अभ्यासक्रम संपूर्ण (८ पेपर्स) स्वरूपाचे असून ते नियमित, सेमिस्टर आणि अंतर्गत अधिक बाह्य मूल्यमापन (४०+६० गुण) अशा पद्धतीचे आहेत.

विज्ञान, वाणिज्य, शेतीविधी, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र अशा अन्य विद्याशाखेतील पदवीधर किंवा कला शाखेच्याच उपरोक्त विषयांपेक्षा वेगळे विषय घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीदेखील प्रवेश घेऊ शकतात. मात्र याकरिता त्यांना हव्या असलेल्या विषयाची सामान्य चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही चाचणी परीक्षा सोमवार दि. ०१ जुलै २०१९ रोजी होणार आहे. या परीक्षेचे अर्ज दि. २८ जून २०१९ पर्यंत कार्यालयामधील श्रीमती लाला यांच्याकडे द्यावेत. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.