gogate-college-autonomous-logo

‘कार्यकर्तृत्वातून लोकमान्य टिळकांनी कर्मयोग साधला’- श्रीकांत श्रीसागर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रत्ननगरीतील नरकेसरी लोकमान्य टिळकांच्या ९९व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ‘टिळकांचा कर्मयोग’ याविषयी आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगतज्ज्ञ आणि योगप्रशिक्षक श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा प्रारंभ कला शाखेतील द्वितीय वर्षाचे पत्रकारिता विषयाच्या विद्यार्थी लिखित ‘लोकमान्य टिळकांची पत्रकारिता’ याविषयावरील भित्तीपत्रकाच्या अनावरणाने झाला.

श्री. क्षीरसागर यांनी लोकमान्य टिळकांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून कर्मयोग कसा साधला याचे अनेक दाखले देताना लोकमान्यांचा लोकसंग्रह, सर्वजनिक उत्सवांची सुरुवात, त्यांनी आपल्या बंदी काळात लिहिलेले गीतारहस्य या प्रमुख गोष्टींचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणकौशल्याच्या माध्यमातून समाजासाठी कार्यप्रवृत्त झाले पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शक विचार त्यांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवले. मानसिक ताणतणावांपासून मुक्त राहण्यासाठी करावयाच्या काही योगासनांचे सादरीकरण त्यांनी करून दाखविले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कु. स्वरदा महाबळ हिला कै. उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कु. तीर्था सोमण आणि कु. अपूर्वा आचार्य यांना कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक, कु. सोनल ढोल्ये हिला लोकमान्य टिळक पारितोषिक आणि कु. श्रद्धा शितप आणि कु. तन्वी बेर्डे यांना कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातील अनुक्रमे कु. वर्षा योगेश काळे, कु. हृषीकेश विवेक वैद्य, कु. सिद्धी जनार्दन साळवी, कु. सोनल गोपाल ढोल्ये यांना विजेतेपदाची पारितोषिके तर कु. शाहिन जाकीर अमिनगड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुक्रमे कु. आकांक्षा दीपक जावडेकर, कु. सायली नीलकंठ रानडे, कु. स्नेहल संतोष तवटे, कु. जान्हवी दिगंबर मुणगेकर यांना विजेतेपदाची पारितोषिके तर कु. वैशाली रवाळू चोपडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुक्रमे कु. हर्षदा प्रवीण कुबल, कु. सायली नीलकंठ रानडे, कु. दीप्ती अंकुश वळंजू, कु. जान्हवी जितेंद्र साळवी यांना विजेतेपदाची पारितोषिके तर कु. सानिका कमलेश कोल्हटकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर होते. लोकमान्य टिळकांचा कर्मआदर्श विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून अनुकरणीय असल्याचे मत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. विविध स्पर्धांतील पारितोषिक विजेत्या सर्व विद्यार्थ्याचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला उपप्राचार्य विवेक भिडे, डॉ. कल्पना आठल्ये, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम समिती समन्वयक डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम
Comments are closed.