gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कौशल्य विकास’ अंतर्गत विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन

महाविद्यालयातील विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलच्यावतीने आणि विविध सरकारी संस्था तसेच खाजगी आस्थानापानांच्या सहकार्याने विविधांगी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. कला शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचे अधिकारी श्री. ग. प्र. बिरोडे यांनी ‘कौशल्य विकासाचे करिअर डेव्हलपमेंट मधील महत्व’ असेच भारत सरकारच्या ‘कौशल्य विकास कार्यक्रमावर’ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर ‘व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग’ या विषयावर एम.सी.व्ही.सी. विभाग प्रमुख प्रा. माधव पालकर यांनी मार्गदर्शन केले.

कॉमर्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी येथील इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर शमा दलाल यांनी ‘उद्योजकता विकास आणि विविध योजना’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भविष्यात उद्योजक होण्याच्या दृष्टीने कशी वाटचाल करता येईल याबाबत विस्तृत विवेचन केले.

आणखी एका व्याख्यानात ‘इंडस्ट्रिअल ट्रेनिंग सेन्टर’ (आय.टी.आय.) रत्नागिरीचे उपप्राचार्य श्री. सोनावणे आणि निदेशक श्री. साखळकर यांनी कॉमर्स आणि व्यवस्थापन शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत ‘व्होकेशनल एजुकेशन अँड ट्रैनिंग’ संबंधी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती दिली आणि यशस्वी जीवनातील कौशल्य विकसनाची गरज स्पष्ट केली. अखेरच्या दिवशी फिनोलेक्स इंडस्ट्रीज, रत्नागिरी तर्फे श्री. टी. के. काकडे, श्री. सुधीर मुळ्ये, श्री. राहुल कुलकर्णी, श्री. माधव साळसकर या विविध आस्थापनांचे अधिकाऱ्यांनी ‘केमिकल इंडस्ट्रीजमधील रोजगाराच्या संधी आणि आवश्यक कौशल्ये’ या विषयावर शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण व्यावसायिक मार्गदर्शनाचा महाविद्यालयातील विविध शाखांतील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सहकारी प्राध्यापकांबरोबरच प्रा. रुपेश सावंत आणि डॉ. उमेश संकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.