gogate-college

‘Come and learn constitutional history & political system of India through film’ गोगटे जोगळेकर महाविद्यालया चा अनोखा उपक्रम

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ‘Come and learn constitutional history & political system of India through film’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील आणि लोकशाहीतील मूल्ये रुजवित, त्यांना संविधानाविषयी माहिती व्हावी, संविधांप्रती आदर व निष्ठा निर्माण होऊन भविष्यात उत्तम नागरिक तयार व्हावेत या हेतूने महाविद्यालयाच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

राज्यशास्त्र विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी रत्नागिरीतील जी.जी.पी.एस. या शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व सांगून ‘सरनाम्याचे सामूहिक वाचन’ केले. त्यानंतर संविधानाची मूलभूत माहिती देणारी लघुचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. गतवर्षीदेखिल विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील १४ शाळांमध्ये सरनाम्याचे सामूहिक वाचन केले होते. हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत जी.जी.पी.एस.चे मुख्याधापक श्री. प्रतापसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले.

Comments are closed.