gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘विधी साक्षरता क्लब’ची स्थापना

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतीच विधी साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे. सदर क्लब स्थापन करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी निगडित कायदे आणि कायदेविषयक शिक्षेच्या तरतुदींविषयी जनजागृती करण्यासाठी विधी साक्षरता क्लब स्थापन झाला आहे. या साक्षरता क्लब कक्षाचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एल. दि. बिले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. संजीव सामंत, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि क्लबचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने सदर क्लबकरीता संगणक आणि इतर साधने पुरविण्यात आली तसेच विविध कायदेविषयक पुस्तके महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली.

Comments are closed.