gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे कै. एस. व्ही. कानिटकर स्मृती व्याख्यानमालेचा प्रारंभ

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे २०१९-२० या वर्षापासून गणित विभागाचे माजी विद्यार्थीप्रिय विभागप्रमुख कै. श्रीरंग विश्वनाथ कानिटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गणित विषयाला वाहिलेली व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. कै. कानिटकर यांनी गणित विभागप्रमुख म्हणून महाविद्यालयात तेरा वर्षे काम पहिले. त्यांच्या कारकिर्दीत महाविद्यालयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. गणित हे विषय सुरु झाले. त्यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष, विद्यार्थिनी वसतिगृहाचे अधिक्षक म्हणूनही काम पहिले. त्याचे स्मरण कायम राहावे आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी डॉ. विवेक पाटकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. पाटकर हे स्वतंत्र शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ‘बहुरंगी गणित’ या विषयावर अतिशय उद्बोधक व्याख्यान दिले. त्यांनी सुलभ आणि रंजक पद्धतीने गणित हा विषय गणित प्रेमिंसमोर मांडला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या उद्बोधक उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या.

या व्याख्यानासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी आणि अनेक गणित प्रेमींनी घेतला. गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments are closed.