gogate-college

कै. नाना वंजारे वक्तृत्व स्पर्धेवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची मोहोर

कै. नाना वंजारे वक्तृत्व स्पर्धेवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची मोहोर

न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, लांजा तर्फे प्रतिवर्षी कै. नाना वंजारे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सदर स्पर्धा लांजा येथे नुकतीच संपन्न झाली.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांकरिता असलेल्या या स्पर्धेत या वर्षीही गोगटे जोगळेकर महाविद्यालायाने सांघिक पारितोषिके प्राप्त करत आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित केले. गेल्या पाच वर्षांत चारवेळा हा चषक गोगटे जोगळेकर महाविद्यालायाने पटकवला आहे. संघात प्राथम वर्षाच्या कु. सोनल ढोले आणि कु. सिद्धी साळवी या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सोनलने ‘महाविद्यालयीन निवडणूक आणि विद्यार्थी’ हा विषय मांडत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर सिद्धी हिने ‘आर्थिक मंदी आणि भारतीय अर्थव्यवस्था’ हा विषय मांडून उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. विजेत्या संघाला प्रा. जयंत अभ्यंकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

विजेते विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांचे संस्था पदाधिकारी आणि प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.