gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानतर्फे क्षमता कार्यशाळेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मानव संसाधन विभागाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) या योजनेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पंकजकुमार (आय.ए.एस.), राज्य प्रकल्प अधिकारी, रुसा, महाराष्ट्र; डॉ. के. शांती, प्राध्यापक-संचालक, मानव संसाधन विकास संस्था, मुंबई विद्यापीठ, मुंबई; डॉ. पी. एन. पाबरेकर, वरिष्ठ सल्लागार, रुसा, महाराष्ट्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.

सदर निवासी कार्यशाळा दि. १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्यातील मॉडेल कॉलेजमधील प्राध्यापक सहभागी झाले असून या कार्यशाळेचे उद्दिष्ट हे प्राध्यापकांच्या अध्यापन कौशल्याची क्षमता वृद्धींगत करणे आहे.

श्री. पंकज कुमार यांनी सदर कार्यशाळेचा उद्देश सांगताना रुसाच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे काम केले गेले आहे आणि त्यामधून कशाप्रकारचे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत, रुसाची यामधील भूमिका काय आहे याविषयी माहिती दिली. डॉ. शांती यांनी कार्यशाळेची संकल्पना स्पष्ट करताना महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी मानव संसाधन विकास विभागाच्या असलेल्या योजना आणि त्यांच्या आवश्यकतेबद्दल विस्तृत माहिती दिली.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयाच्यावतीने उपस्थित पाहुण्यांचे आणि कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असेल अशी महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले.

Comments are closed.