gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कालिदास दिन’ संपन्न

आषाढ महिन्याचा पहिला दिवस ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही हा दिवस दि. १३ जुलै २०१८ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी श्लोक गायनाने केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केले. संस्कृत विभागप्रमुख आणि कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी ‘संस्कृत साहित्यातील विज्ञान’ या विषयावर सचित्र सादरीकरणातून मार्गदर्शनपर भाषण केले. मेघदूत आणि रघुवंश या कालिदासाच्या साहित्यातील विज्ञान आणि आधुनिक शास्त्रज्ञ यांची मते व त्यांचे संशोधन विषद केले.
या दिवसाचे औचित्य साधून संस्कृत विभागाच्या ‘गीर्वाणकौमुदी’ या विद्यमान वर्षीच्या पहिल्या भित्तपत्रकाचे अनावरण उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांच्या हस्ते करण्यात आले. विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कालिदासाच्या साहित्यातील निसर्ग’ या विषयावरील भित्तिपत्रकाची माहिती भार्गव वळंजू याने सांगितली.
यावेळी संस्कृत विषयाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी एप्रिल २०१८ मधील विद्यापीठाच्या परीक्षेत प्राप्त केलेल्या सुयशाबद्दल संस्कृत विभागाच्यावतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूप या विद्यार्थ्यांपैकी कु. स्वरदा महाबळ हिने मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्रुत चितळे याने केले. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

GJC Kalidas Din Program
Comments are closed.