gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात श्रीराम फायनान्सकरिता दि. २२ रोजी मुलाखती

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे श्रीराम फायनान्समधील ‘प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह-सेल्स अँड रिकव्हरी’ या पदाकरिता बुधवार दि. २२ मे २०१९ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी (फक्त मुलगे) उपस्थित राहू शकतात. त्याचप्रमाणे तृतीय वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थीही उपस्थित राहू शकतात. या मुलाखती सकाळी १०.०० वाजता मुख्य इमारत, सेमिनार हॉल येथे होतील. यावेळी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत बायोडेटा आणि मूळ प्रमाणपत्रांसाहित उपस्थित राहावे.

याविषयी अधिक माहितीकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत (9421142529) यांचेशी संपर्क साधावा तसेच उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.