gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘ऐश्वर्या सावंत’ हिची इंग्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला ‘खो-खो स्पर्धेकरिता’ निवड

सप्टेंबर मध्ये इंग्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू कु. ऐश्वर्या सावंत हिची निवड झाली आहे. ऐश्वर्या हिने मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य महिला खो-खो संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तसेच तिने महाराष्ट्र राज्य शासनाचा मानाचा असा ‘जानकी पुरस्कार’ आणि भारतातील खो-खो खेळासाठी महिला खेळाडूंना दिला जाणारा ‘राणी लक्ष्मी’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून तिला सन्मानित करण्यात आले आहे. तिला शासनाची शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील व महाविद्यालयाची एक गुणी खेळाडू असलेल्या कु. ऐश्वर्या हिची दि. 0२ ते 0४ सप्टेंबर २०१८ रोजी इंग्लंड येथे संपन्न होणाऱ्या खो-खो खेळाच्या प्रसारासाठी व प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे निवड झाली आहे.

कु. ऐश्वर्या हिच्या निवडीबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर व सर्व पदाधिकारी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तिनही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे कार्यवाह श्री. संदीप तावडे, राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक श्री. पंकज चवंडे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Aishwarya Sawant with Chairman Shilpatai Patwardhan, Satish Shevde, Chandrashekhar Kelkar, Principal Dr. Kishor Sukhtankar
Comments are closed.