gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने चार दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

रसायनशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना आणि या क्षेत्रातील संशोधनाची दिशा यासबंधी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘रिसेंट ट्रेंड्स इन ऑरगॅनिक अँड इनऑरगॅनिक केमिस्ट्री’ या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रसायनशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळे दरम्यान नामवंत व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी देशाच्या विविध राज्यातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

या कार्यशाळेचा औपचारिक समारोप संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होते. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी कार्यशाळेसाठी लाभलेल्या सर्व वक्त्यांचे, सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकवृंदाचे आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, वेस्ट इंडिया सेक्शनच्या डॉ. लक्ष्मी रविशंकर यांचेही आभार मानले.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले.

Comments are closed.