gogate-college

भारतीय ‘संविधान दिना’चे औचित्य साधून कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

Sanvidhan Din

दि. २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘संविधान’विषयक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय संविधान सर्वांना समान अधिकार प्रदान करते. संविधानाचा सर्वांनी आदर केला पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. संविधान तयार करणाऱ्यांविषयी आपल्याला माहिती पाहिजे. महाविद्यालयात ‘संविधान सप्ताह’ साजरा करावा अशी सूचना केली आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने आयोजित केलेल्या संविधानविषयक ग्रंथ प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. यास्मिन आवटे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश कांबळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. बी. सी. भिंगारदिवे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बिना कळंबटे, प्रा. आनंद आंबेकर, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. मंगेश भोसले, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निलेश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रदर्शन श्री. उत्पल वाकडे केले.

Comments are closed.