gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘भारतीय स्वातंत्र्य दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७२वा ‘स्वातंत्र्य दिन’ विविध कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी लेफ्ट. डॉ. स्वामिनाथन भट्टार यांच्या नेतृत्वाखाली शानदार संचलन करून मानवंदना दिली. यानंतर छात्रांना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्ट. प्रा. दिलीप सरदेसाई यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, अनेक नामवंत माजी विद्यार्थी उपस्थित होते.

सहकार भित्तिपत्रकाचे औचित्य साधून महाविद्यालयीन ग्रंथालयात ‘पर्यटन’ विषयाला वाहिलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन आणि ‘माझ्या परिसरातील निसर्गरम्य स्थळे’ या विषयावरील सहकार भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. सुखटणकर आणि माजी विद्यार्थी श्री. मिलिंद मिरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर मुख्य इमारतीत गणित विभागाच्या ‘इंडियन मॅथेमॅटिशियन’; आय.टी. विभागाच्या ‘डिफेन्स ऍडवान्स सिस्टीम यूज्ड बाय इंडियन आर्मी’; महिला विकास कक्षातर्फे ‘इंडियन स्पोर्ट्स वुमेन बरिंगिंग ग्लोरी टू नेशन’ या विषयावरील आपण साऱ्याजणी भित्तीपत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेला मुख्य समारंभ आणि त्यानंतर देशभक्तीपर समूहगीत सादरीकरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी इंग्रजी विभागाच्या ‘जिजेशियन्स’ न्यूजलेटरचे ई-प्रकाशन, वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागाच्या अनुक्रमे ‘माध्यम’ आणि ‘मशाल’ या हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महाविद्यालयाच्या ‘GoJoCo’ या अँपचे अनावरण होय. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी अँपविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यातील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि समूहगीत स्पर्धेतील विजेत्यांचा प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर होते. तर प्रमुख उपस्थिती प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांची होती. याप्रसंगी सर्व विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

Comments are closed.