gogate-college

‘शेअर बाजार एक उत्पन्नाचा स्त्रोत’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन

‘शेअर बाजार एक उत्पन्नाचा स्त्रोत’ या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन आयोजित केले. शेअर बाजाराविषयी अनेकांच्या मनात अनेक संदेह असतात. मात्र हाच शेअर बाजार अनेकांना आपला उत्पन्नाचे साधन म्हणून उपयुक्त ठरतो या गोष्टीची जाणीव ठेऊन अर्थशास्त्र विभाग गोगटे महाविद्यालय, रत्नागिरी व अर्थशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी यांच्याविताने मुंबई येथील शेअर बाजार विश्लेषक श्रीमती वृंदा वझे यांचे मार्गदर्शन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना शेअर बाजार हा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्याकडे पहिले पाहिजे तसेच बँकिंग क्षेत्र, सरकारी क्षेत्र याच बरोबरीने चांगले करियर करण्याची मोठी संधी असणारे क्षेत्र म्हणून शेअर बाजार उपयुक्त ठरू शकतो असे मौलिक विचार श्रीम. वझे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी मेहनत घेतली व विभागातील शिक्षकांनी सहकार्य केले. माजी विद्यार्थी कार्यकारिणीच्या सर्व सभासदांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.

तसेच गोगटे जोगळेक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पध्दतीने एकत्रित येऊन अर्थशास्त्र विभागाच्या विकासासाठी चर्चा केली. या चर्चेमध्ये २०२१-२२चे अध्यक्ष- राजेश बिर्जे; उपाध्यक्ष-श्रेया राऊत आणि प्रा दिगंबर चौगुले; खजिनदार- चारुता खेर; सहखजिनदार- प्रियांका चौगुले; सचिव- शीतल धनावडे; सहसचिव- प्रा. विनोद भुवड व पूनम आयरे; प्रवक्ता- सुर्यकांत माने; पुरुष प्रतिनिधी- पराग कांबळे; महिला प्रतिनिधी- युक्ता शिवदे अशी माजी विद्यार्थी कार्यकारणी करण्यात आली. यावेळी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी विभागाच्या उन्नतीसाठी काय करता येईल याविषयी आपली मते व्यक्त केली. सर्वांनी विभागाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी याबाबत मार्गदर्शन केले.

Comments are closed.