gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सिद्दार्थ वैद्य याला ‘राष्ट्रीय स्थलसेना शिबीरात’ सुवर्णपदक

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय भूदल छात्र सेनेचा विद्यार्थी सिद्दार्थ वैद्य याने अमरावती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘राष्ट्रीय स्थलसेना शिबीरात’ सहभागी होत नेमबाजीतील सुवर्ण पदक पटकावले आहे. प्रतिवर्षी दिल्ल्ली येथे स्थल सैनिक शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिराची निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय भूदल छात्र सेनेचे विद्यार्थी प्रत्येकी १० दिवसांच्या तीन शिबिरांमध्ये सहभागी होतात. नकाशा वाचन, तंबू उभारणे, शारीरिक कसरती आणि नेमबाजी असे निवड प्रक्रियेचे निकष होते.

सिद्दार्थ याला लेफ्ट. डॉ. एस. एल. भट्टार, कॅ. डॉ. सीमा कदम, लेफ्ट. प्रा. अरुण यादव, लेफ्ट. दिलीप सरदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने संपादन केलेल्या सुयशाबद्दल प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कु. सिद्दार्थ आणि राष्ट्रीय भूदल छात्र सेनेचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

सिद्दार्थ वैद्य याला कमांडिंग ऑफिसर, ११ महाराष्ट्र बटालियन, अकोला; कर्नल सी. इलावर्सन यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करताना

फोटो- सिद्दार्थ वैद्य याला कमांडिंग ऑफिसर, ११ महाराष्ट्र बटालियन, अकोला; कर्नल सी. इलावर्सन यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करताना

Comments are closed.