gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन

मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया (एम.एस.आय.) ही खारफुटीबाबत जागृती निर्माण करणारी संस्था १९९० साली मुंबई येथे, महाराष्ट्र आणि गोवा कमिटी जवाहरलाल नेहरू बायोडायव्हर्सिटी प्रोग्राम यांनी स्थापित केली. खारफुटीचा वाढता ऱ्हास लक्षात घेता लोकांमध्ये त्वरित जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर संस्था कार्यरत आहे. सार संस्थेचे श्री. एस. पी. गोदरेज हे अध्यक्ष तर डॉ. ई. जी. साईलसे आणि श्रीमती गीता श्रीनिवासन हे उपाअध्यक्ष आहेत. एन. आय. ओ., गोवा मधून निवृत्त झालेले शास्त्रज्ञ डॉ. ए. जी. उंटावले सदर संस्थेचे कार्यकारी सचिव आहेत.

या संस्थेने ०२ फेब्रुवारी २०१५ पासून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘एम. एस. आय. चॅप्टर– कोकण रिजन’ अधिकृतरित्या मान्य केला आहे. या सलग्न प्रकरणानिमित्ताने एम.एस.आय. लवकरच व्यस्थापन समिती नेमणार आहे. खारफुटीविषयी जागरूकता, संवर्धन, संरक्षण अशा प्रकारचे पर्यावरण पोषक, शास्त्रोक्त पद्धतीच्या विश्वसनिय कार्यप्रणालीचे काम या अनुषंगाने करण्यात येणार आहे. खारफुटी पुनर्वसनावर जोर देऊन उत्कृष्ट दर्जाचे संशोधन करण्यात येईल. विविध परिसंवाद, प्रदर्शने, कार्यशाळा आणि परिषदांचे आयोजन करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. सदर कार्यासाठी विविध शासकीय आणि खाजगी संस्थांकडून भविष्यात निधी जमविण्याचाही प्रयत्न केला जाईल.

सदर प्रकल्पाचे सदस्यत्व हे एम.एस.आय.च्या नियमावलीप्रमाणे देण्यात येईल. कोकण विभागाचे कार्य हे एम.एस.आय., गोवा या संस्थेच्या देखरेखीखाली राहील. संपूर्ण कार्यप्रणालीकरिता मार्गदर्शन आणि सूचना या एम.एस.आय. देईल.

Comments are closed.